बहुसंख्याकांनी विविध माध्यमांचा वापर करून अल्पसंख्य समुदायाला लक्ष्य करण्याचा, हा प्रकार नवा नाही, तर ‘रवांडा रेडिओ’ नावाने अलीकडच्या इतिहासात प्रसिद्ध आहे

आफ्रिका खंडातील बारा कोटी लोकसंख्या असणाऱ्या रवांडा या देशामध्ये ८५ टक्के हुतू, १४ टक्के तुत्सी आणि १ टक्का त्वा जमातीचे लोक राहतात. हुतू जमातीचे प्रशासनावर वर्चस्व होते आणि त्यातून तुत्सी जमातीवर अन्याय होत असल्याच्या भावनेतून १९९० ते १९९४ या काळामध्ये गृहयुद्ध सुरू होते. रवांडाचे सरकारचे प्रतिनिधित्व करणारे रवांडन सशस्त्र दल आणि बंडखोर रवांडन पॅट्रिऑटिक फ्रंट यांच्यामध्ये गृहयुद्ध लढले गेले.......